सांगरूळ /प्रतिनिधी
राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी कृषि पंपांच्या जोडणीसाठी पैसे भरले आहेत.मात्र दिनांक १ एप्रिल २०१८ पासून त्यांना शेती पंपासाठी प्रतिक्षा करावी लागत असून या शेतकऱ्यांना तातडीने वीज कनेक्शन जोडण्या दयाव्यात,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय चे उपाध्यक्ष आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी केली होतीं.यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने जोडण्या देण्याचा निर्णय घेतला असून आ.पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
मार्च २०१८ पूर्वी पैसे भरलेल्या ग्राहकांना वीज कनेक्शन दिले जात होते.मात्र दिनांक१ एप्रिल २०१८ नंतर ज्या ग्राहकांनी पैसे भरले अशा ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.संबंधित रोहित्रावर वर विजेचा भार शिल्लक असला तरी कनेक्शन मिळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.नवीन वीज कनेक्शन देण्यासाठीची प्रकिया सुटसुटीत करण्यासाठी वीजकंपनीने अनेक पावले उचलली आहेत.त्यामध्ये ऑनलाइन सेवा उपलब्ध करुन देणे,कनेक्शन तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी ए वन फॉर्म ऑनलाइन उपलब्ध करुन देणे असे असतानाही कनेक्शन वेळेत मिळत नव्हती.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.
याबाबत आः पाटील यांनी विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न मांडला होता.मात्र अधिवेशन दोनच दिवस चालले.त्यामुळे आ.पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना भेटून याबाबीची माहिती दिली व प्रलंबित वीज कनेक्शन तातडीने देण्याची मागणी केली.यावेळी ना.राऊत यांनी सचिवांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या.याबाबत शासन पातळीवर निर्णय घेऊन ज्या रोहित्रावर भार शिल्लक आहे.तेथील कनेक्शन जोडण्याबाबत आदेश काढण्यात आला आहे.त्यामुळे आ.पाटील यांच्या पाठपुराव्याला यश येऊन राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









