आम आदमी पक्ष
प्रतिनिधी / पणजी
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा डबल ट्रेकिंग संबधीत व्हिडिओ रेकॉर्डिंग सध्या वायरल होत आहे. या रेकोर्डांगमध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की गोव्याला दुहेरी मार्गाची गरज नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार स्वत:च्या फायद्यासाठी मुरगाव पोर्ट ट्रस्टने याला बढती दिली. त्यामुळे सरकारने सध्या लोकांची फसवणूक करण्याचे थांबवावे. असे आपचे गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
आम आदमी पार्टीने दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी दुहेरी मार्गाला कधीही आक्षेप घेतला नव्हता या मुख्यमंत्र्यांच्या ताज्या विधानाला उत्तर देताना वरील विधान केले.
गोव्याचे मुख्यमंत्री असताना पर्रीकर यांनी गोवा सरकार दक्षिण पश्चिम रेल्वेमार्गाच्या दुहेरी मार्गाला परवानगी देणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, “एमपीटीला जे हवे आहे, त्याचे मी समर्थन करू शकत नाही.’’ दुहेरी मार्गाला परवानगी नाकारल्याची घोषणा करताना मनोहर पर्रीकर म्हणाले होते की, यामुळे गोव्यातील कोणत्याही औद्योगिक कार्यामध्ये वाढ होणार नाही,उलट केवळ भूसंपादनाच्या खर्चामुळे राज्य सरकार वर आर्थिक भार येईल. असे असतानाही मुख्यमंत्री डॉ. सावंत डबल ट्रेकिंगवर गोमंतकीयांना फसवित आहे. असेही म्हांबरे यांनी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षात घ्यायला पाहीजे की नेहमीच लोकांना आपण फसवू शकत नाही. गोव्यातील लोक आता मोठय़ा प्रमाणात शिक्षित व जागृत झाले आहे. असेही म्हांबरे यांनी सांगितले.









