सलग पाचव्या महिन्यात घसरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे देशातील बंदरांमधील उलाढाल ठप्प पडल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये प्रमुख बंदरातील उलाढालीतील घसरण ही पाचव्या महिन्यातही कायम राहिल्याची नोंद केली आहे. व्यवसाय वर्षामध्ये एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीपर्यंत देशातील प्रमुख बंदरांमधील उलाढालीत मागील वर्षाच्या तुलनेत समान काळात 16.56 टक्क्मयांची घसरण झाली आहे.
या दरम्यान बंदरावर 24.504 कोटी टन मालाची उलाढाल(कार्गो हँडलिंग) राहिली आहे. केंद्र सरकारने 12 बंदरांतील उलाढाल ऑगस्टमध्ये सलग पाचव्या महिन्यात घटली असल्याचे सांगितले. मार्मुगाव सोडून अन्य 11 बंदरांच्या उलाढालीत घसरण राहिली आहे. आयपीएने म्हटले आहे, की मागील वर्षाच्या समान कालावधीत 12 बंदरांवर 29.367 कोटी टनाच्या मालाची उलाढाल झाली आहे.
देशाचा कार्गो ट्रफिक
देशातील 12 प्रमुख बंदरांमध्ये दिनदयाळ(जुने नाव कांदला), मुंबई, जेएनपीटी, मोर्मुगाव, न्यू मंगळूर, कोच्ची, चेन्नई, कामराजार (जुने नाव एन्नोर), वीओ चिदंबरनार, विशाखापट्टणम, पारादीप आणि कोलकाता(हल्दियासह) आदांचा समावेश आहे. यांचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. व्यापारी वर्ष 2019ते 20 मध्ये या बंदरांद्वारे एकूण 70.5 कोटी टन कार्गो ट्रफिक हाताळले गेले होते.









