प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे मेडिकल लिव्हवर गेल्याने या पदाचा जबाबदारी डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. डॉ.फुले यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.
डॉ. बोल्डे यांची तब्येत बरी नसल्याने ते मेडिकल रजेवर गेले आहेत. डॉ फुले यांनी यापूर्वीही शासकीय रुग्णालयाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला आहे. त्यामुळे हा पदभार डॉ. बोल्डे यांनी डॉ. फुले यांच्याकडे सोपविला आहे. गुरुवारी रात्री याबाबतचे लेखी आदेश मिळाल्यानंतर डॉ फुले यांनी शुक्रवारी सकाळी पदभार स्वीकारला.
दिवसेंदिवस जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रूग्णावर वेळेत उपचार होण्याला आपले प्राधान्य राहील. त्याचबरोबर रुग्णालयाचा कारभार अधिक सुरूळीत होण्यासाठी टीम वर्कने काम करण्यात येईल असे डॉ. फुले यांनी सांगितले.









