हवाई हल्ल्यांमध्ये मोठे नुकसान : बेलगोरोद शहरातील तेल डेपो उडवून दिला
किव्ह / वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध 37 व्या दिवशीही सुरू आहे. रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून युक्रेनच्या लष्कराने आता रशियन शहरावर हल्ला केला आहे. रशियाच्या पश्चिमेकडील शहर बेल्गोरोदवर शुक्रवारी युपेनच्या दोन हेलिकॉप्टरनी चढाई केली. या हवाई हल्ल्यामध्ये तेल डेपोवर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघे जखमी झाल्याचे रशियाच्या पश्चिमेकडील शहर बेल्गोरोदचे गव्हर्नर म्हणाले.
महिन्याभरापासून सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांच्या लष्करासोबतच सर्वसामान्य नागरिकांचीही मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेनच्या प्रॉसिक्मयुटर जनरल ऑफिसनुसार, रशियन हल्ल्यात आतापर्यंत 153 मुलांचा मृत्यू झाला आहे, तर 245 हून अधिक मुले जखमी झाली आहेत.
चेरनोबिल प्रकल्पातून रशियाची माघार
रशियन सैन्याने 24 फेब्रुवारी रोजी चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला. येथून आता रशियन सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केली आहे. रशियन सैनिक चेरनोबिलपासून दूर जात आहेत आणि बेलारूसमध्ये प्रवेश करत असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका वरि÷ अधिकाऱयाने सांगितले.
अमेरिका-ब्रिटनने लादले नवीन निर्बंध
अमेरिकेने रशियन तंत्रज्ञान कंपन्यांवर नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 34 संस्था आणि अनेक व्यक्तींवर नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स तयार करणाऱया कंपन्याही आहेत. तसेच ब्रिटनने रशियन मीडिया संस्थांवर निर्बंध लादले आहेत. युक्रेनमधील युद्धाचा प्रचार आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल ब्रिटनने डझनहून अधिक रशियन मीडिया व्यक्ती आणि संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुतिन यांच्यासंबंधी खोटय़ा बातम्या देणाऱया प्रचारकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत, असे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस यांनी सांगितले.
तेल पुरवठय़ाबाबत व्हाईट हाऊसची स्पष्टोक्ती
युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुढील सहा महिन्यांसाठी दररोज दहा लाख बॅरल तेल पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. युपेनमधील लष्करी हल्ल्यामुळे, रशियावर अमेरिकेसह अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लादल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम कमी करण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे व्हाईट हाऊसने सांगितले.









