वाढीसोबत संकलन 1.85 लाख कोटींवर
वृत्तसंस्था / मुंबई
कर संकलनाच्या आकडेवारीमध्ये आर्थिक वर्ष 2021-22मध्ये आतापर्यंतचा प्रवास सकारात्मक राहिला आहे. प्राप्तीकर विभागाच्या माहितीनुसार निव्वळ थेट कर संकलन 1.85 लाख केटी रुपयांवर राहिले आहे. जे वर्षभरातील समान कालावधीशी तुलना केल्यास 95,762 कोटी रुपयांवर राहिले होते. यावेळी मात्र संकलनात 100 टक्क्यांची वाढ राहिली आहे.
प्राप्त अहवालानुसार 1 एप्रिल ते 15 जून या कालावधीमध्ये निव्वळ थेट कर संकलन 1 लाख 85 हजार 871 कोटी रुपये राहिले आहे. सदरचा आकडा रिफंड ऍडजस्ट केल्यानंतरचा आहे. यासोबतच यामध्ये कॉर्पोरेट प्राप्तीकर संकलन 74,356 कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्तीकर संकलन 1.11 लाख कोटी रुपये, ज्यामध्ये सिक्युरिटीज ट्रांझॅक्शन करांचा समावेश राहिला आहे.
ऍडव्हान्स कर संकलनात वाढ 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत ऍडव्हान्स प्राप्तीकर संकलन 28,780 कोटी रुपयांवर राहिले. जे मागच्या वर्षी 11,714 कोटी रुपयांवर होते. यासह संकलनात 146 टक्क्यांची वाढ राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.









