प्रतिनिधी/कोल्हापूर
जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवण्यासाठी कोल्हापुरी कन्या कस्तुरी सावेकरला 3 हजार 729 फुट चढाई करायची होती. शिखर मार्गातील पॅम्प-थ्रीवरुन जिद्दीने चढाई करतही होती. 25300 फुटांपर्यंत ती पोहोचली होती. मात्र रौद्ररुप वाटावा असा वेगवान वारा, जीवघेणी हिमवृष्टी व पावस यामुळे शिखर मार्गातील पॅम्प-थ्रीवरुन पॅम्प-टूवर परतावे लागले. येथेही वारा, हिमवृष्टी, पाऊसातडाखा होता. अशा परिस्थिती शिखराच्या दिशेने चढाई म्हणजे जीवच धोक्यात घातल्यासारखेच होणार होते. त्यामुळे निसर्गाचा धोक्याचा संकेत ओळखून कस्तुरीला पॅम्प-टुवर 17 हजार फुटांवरील बेसपॅम्पवर जाऊन एव्हरेस्ट मोहिम थांबवावी लागली आहे, अशी माहिती डिस्ट्रीक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मोहिम थांबवली म्हणजे हार मानली असे नव्हे, नव्या मोहिमेसाठी तिला एक नवा आत्मविश्वास मिळाले आहे, असे कस्तुरीची आई मनस्विनी व वडील दीपक सावेकर यांनी यावेळी सांगितले. अधिक माहिती देताना डॉ. अडके म्हणाले, 29 हजार 29 फुट उंचीचे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या मोहिमेला कस्तुरीने गेल्या 27 मार्चपासून प्रारंभ केला होता. शिखराकडे जाताना तिला 40 ते 60 टक्के मायनस टेम्परेचर, वादळी वारा, जीवघेणे स्नो फॉल्स, विरळ ऑक्सिजन, अशी संकट झेलायची होती. साडे तीन वर्षे केलेला सराव आणि लोकसहभागातून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर तीने एव्हरेस्ट शिखराची चढाई करण्याचे शिवधणुष्य उचलले. चढाई करताना वातावरणाशी शरीर मिळते-जुळते व्हावे यासाठी तीने शिखर मार्गातील बेसपॅम्प ते पॅम्प-थ्रीपर्यंतचा टप्प्या-टप्प्याने 3 वेळा ऍक्लमाटाईज वॉक केला आहे. तिला फक्त एव्हरेस्ट शिखरावर जाण्यासाठी वेदर विन्डो म्हणजेच स्वच्छ वातावरणाची प्रतिक्षा होती. सुदैवाने वेदर विंडोही मिळाली होती. त्यानुसार शिखरावर जाऊन देशाचा तिरंगा फडकविण्यासाठी 21 मे रोजीच्या रात्री बेसपॅम्पवरुन चढाई करत ती मोठÎा धैर्याने पॅम्प-टुवर पोहोचली होती.
डॉ. अडके पुढे म्हणाले, 24 हजार 500 फुटावरील पॅम्प-थ्रीवरही ती गेली. येथून तिला फक्त 4 हजार 529 फुट चढाई करुन एव्हरेस्टच्या शिखरावर जायचे होते. 25 मे पहाटेच्या सुमारास तीने कृत्रिम ऑक्सिजनच्या सहाय्याने चिंचोळा मार्ग, खोल दऱया, वेगाने वाहणार वारा व बर्फवृष्टी या संकटाशी सामना करत कस्तुरीला 26 हजार फुटावरील कॅम्प-फोरवर जायचे होते. मात्र 25 मे रोजी तौक्ते व यास वादळामुळे वातावरण मोठा बदल होऊन वेगवान वारा, हिमवृष्टी आणि पाऊस याचा मारा सुरु झाला. त्यामुळे चढाई थांबवून ती पॅम्प-थ्रीवर माघारी परतली. येथेही वारा आणि हीमवृष्टीच्या संकटामुळे तिला पॅम्प-टूवर परतावे लागले. मात्र पॅम्प-टुवरही या संकटांचा तडाखा गेल्या रविवारपर्यंत थांबला नव्हता. त्यामुळे कस्तुरी व सोबतचा शेर्पा (वाटाडÎा) यांनी पॅम्प-टुवरुन बेसपॅम्पवर जाऊन एव्हरेस्ट शिखर सर करण्याची मोहिम थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. अडके यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस कस्तुरीचे मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय मोरे, योगशिक्षक वीणा मालदीकर, क्रीडा शिक्षक आनंदा डाकरे, उदय निचिते, जीवरक्षक दिनकर कांबळे, अरविंद कांबळे व विश्वनाथ भोसले आदी उपस्थित होते.
कस्तुरीच्या आई–वडीलांना अश्रु आनावर...
कस्तुरीला एव्हरेस्ट शिखरावर देशाचा तिरंगा लहरताना पाहण्यासाठी आई मनस्विनी आणि वडील दीपक सावेकर हे इच्छा गेल्या चार महिन्यांपासून बाळगून होते. मात्र निसर्गाच्या रौद्ररुपामुळे कस्तुरीची मोहिम थांबवावी लागल्याचे कळताच त्यांना अश्रू अनावर झाले. मात्र निसर्गाच्या रौद्ररुपातही कस्तुरीने 25300 फुटांपर्यंतची चढाई करुन कोल्हापूरचे नाव रोशन केल्याचा हेवा वाटतो, असे कस्तुरीची आई मनस्विनी यांनी सांगितले.









