कालकुंदीतील शरीरसौष्ठव स्पर्धा : राजकुमार दोरगुडे उत्कृष्ट पोझर, बसवाणी गुरव मस्क्मयुलर शरीरसौष्टवपटू
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे कालकुंद्री शरीरसौष्टव संघटना व बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज श्री बेळगाव व कोल्हापूर जिल्हा मर्यादित जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धेत बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकरने स्वराज श्री हा मानाचा किताब पटकाविला. मस्क्मयुलर बॉडीबिल्डर बसवाणी गुरव तर उत्कृष्ट पोझर म्हणून राजकुमार दोरगुडे यांनी मानाचा किताब पटकाविला.
कालकुंद्री येथे घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हा व कोल्हापूर जिल्हा मर्यादित स्वराज श्री शरीरसौष्टव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 55 किलो गटात 1) अवधुत निगडे कोल्हापूर, 2) आकाश निंगराणी बेळगाव, 3) अल्ताफ किल्लेदार बेळगाव, 4) शानूल अंकली बेळगाव, 5) राजकुमार दोरगुडे बेळगाव. 60 किलो गट- 1) बसवाणी गुरव बेळगाव, 2) उमेश गंगणे 3) दिनेश नाईक, 4) तौसीफ मुजावर, 5) चिन्नय्या कलमठ सर्व बेळगाव. 65 किलो गट – 1) राकेश कांबळे बेळगाव, 2) रवी इंगवले कोल्हापूर, 3) आदित्य काटकर बेळगाव, 4) शैलेश मजुकर बेळगाव 5) ओमकार गोडसे बेळगाव. 70 किलो गट – 1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 2) युवराज जाधव कोल्हापूर, 3) सुनिल भातकांडे बेळगाव, 4) संदीप पावले बेळगाव, 5) दिवेश धनवडे कोल्हापूर. 75 किलो गट- 1) राम बेळगावकर बेळगाव 2) रोहित भोगण कोल्हापूर, 3) महेश गवाली बेळगाव, 4) राहुल फिग्रीदो कोल्हापूर, 5) ऋग्वेद भोसले कोल्हापूर.
75 वरील गट – 1) अफ्रोज ताशिलदार बेळगाव, 2) गजानन काकतीकर बेळगाव, 3) सौरभ मगदूम कोल्हापूर, 4) प्रशांत भोसले कोल्हापूर, 5) प्रतिक बाळेकुंद्री बेळगाव यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले.
स्वराज श्री किताबासाठी अवधुत निंगाडे, बसवाणी गुरव, राकेश कांबळे, प्रताप कालकुंद्रीकर, राम बेळगावकर, अफ्रोज ताशिलदार यांच्यात लढत झाली. यात आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर प्रताप कालकुंद्रीकर यांने स्वराज श्री हा मानाचा किताब पटकाविला. मोस्ट मस्क्मयुलर बॉडीबिल्डर किताब बसवाणी गुरव तर उत्कृष्ट पोझर राजकुमार दोरगुडे यांनी किताब पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानाचा किताब, रोख रक्कम, आकर्षक चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून गंगाधर एम. सुनिल राऊत, अनंत लंगरकांडे, बसवराज अरळीमट्टी, नूर मुल्ला, राजेश वडाद यांनी काम पाहिले.









