प्रतिनिधी / सातारा
मातोश्री विठाबाई महादेव करपे चँरीटेबल ट्रस्ट सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्त उपजिल्हा अधिकारी सुधाकर करपे, जिल्हा परिषद सदस्या सौ. मधुताई कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक यांच्या पुढाकाराने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन प्रतापसिंहनगर प्राथमिक शाळा चिकणी ग्राउंड येथे करण्यात आले होते. ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
कृष्णानगर प्राथमिक शाळा व प्रतापसिंहनगर प्राथमिक शाळा या शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्वातंत्र्य अमृत महोत्सव याचे औचित्य साधून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धा इंग्लिश स्पिकिंग स्पर्धा योगासन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा आदी उपक्रम राबवण्यात येतात. तसेच स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शनिवारी बक्षीस म्हणून शालेय साहित्य, वह्या आणि पेन देण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याकरिता असे उपक्रम राबविले जातात. बक्षीस वितरण सोहळा जिल्हा परिषद सदस्या सौ. मधुताई कांबळे, सुधाकर करपे, कृष्णानगर शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार जाधव, श्रीमती शेठे, ग्रामपंचायत सदस्य कांतिलाल कांबळे, सोनवलकर, श्रीमती वाघमारे, वाघमळे, श्रीमती कळके, श्रीमती अडसुळे, श्रीमती जगदाळे आदी उपस्थित होते.