सातारा / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकोट उभे केले आहेत.त्यापैकी प्रतापगड हा अभेद्य असा आहे. यावर्षी पावसाळ्यात तटबंदीला धोका निर्माण झाला. त्या गडाच्या संवर्धनासाठी शिवभक्तांनी एक होऊन मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. मदतीचा ओघ सुरू झाला असून गुरुवारी तटबंदीची पाहणी करून दुर्ग सेवकांकडून तटबंदीचा जागर सुरू करण्यात आला.
प्रतापगड तटबंदी संवर्धन मोहीम
छत्रपतींच्या दुर्गासाठी छत्रपतींच्या वारसदारांनी छत्रपतींच्या सेवकांना दिलेली ही मोहीम आहे. अभिनेते दिग्पाल लांजेकर, अजय पूरकर, रमेश परदेशी आणि फत्तेशिकस्त व जंगजोहर चित्रपटातील टीम सह प्रतापगडावर ढासळलेल्या तटबंदी खालील भागाची पाहणी करण्यात आली. उपस्थित सह्याद्रीच्या दुर्गसेवकांच्या साक्षीने जागर सुरू केला. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, सह्याद्री प्रतिष्ठान सातारा जिल्हा अध्यक्ष सागर सुदाम माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रतापगड किल्ल्यावरील बुरुजाखालील ढासळलेल्या भूस्खलनाच्या दुरुस्तीसाठी मदत करण्याचे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
Previous Articleदत्त कारखान्याच्या कोविड सेंटरचा सामान्यांना दिलासा
Next Article कर्नाटकः केरळच्या विशेष केएसआरटीसी ओणम सेवेत वाढ









