प्रतिनिधी/ सातारा
सोमवारी सकाळी स्टेट बॅंकेच्या प्रतापगंज शाखेत सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी गेलेल्यांची काही काळ गैरसोय झाली. बँकेच्या व्यवस्थापनाने सर्व्हर डाऊन झाल्याची तांत्रिक बाब काही वेळात दुरुस्ती करुन ग्राहकांची सोय करुन दिल्याचे बँकेच्यावतीने सांगण्यात आले.









