नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गेल्या दोन दिवसात आणखीनच अत्यवस्थ झाली आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतील लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. 10 ऑगस्ट रोजी मुखर्जी यांनी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मुखर्जी यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मि÷ा मुखर्जी यांनी ट्विट करून त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. तसेच त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱयांचे विशेष आभार मानले आहेत. त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता ते कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.









