नवी दिल्ली / वृत्तसंस्था
10 ऑगस्टपासून इस्पितळात दाखल असलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर दिल्लीतच लष्करी इस्पितळात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती जैसे थे असून फुफ्फुसातील संसर्गावर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. अजूनही ते व्हेंटिलेटरवरच आहेत. त्यांच्या प्रकृतीवर तज्ञ डॉक्टरांकडून नजर ठेवली जात असल्याची माहितीही वैद्यकीय बुलेटीनमधून देण्यात आली. तसेच त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनीही आपल्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.









