नवी दिल्ली
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बुधवारी आणखीनच खालावली. ते अद्यापही व्हेंटिलेटरवर असून वैद्यकीय तज्ञांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेऊन आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणे दिसल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. यासोबतच त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. तेव्हापासून प्रणव मुखर्जी रुग्णालयात दाखल असून प्रकृतीत चढउतार होत आहेत. याआधी प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली होती. 10 ऑगस्ट रोजी प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.









