ओरलँडो : येथे रविवारी झालेल्या एटीपी चँलेजर्स टूरवरील ओर्लेंडो खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू प्रज्नेश गुणेश्वरनला एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
52080 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या ब्रेंडॉन नेकाशिमाने प्रज्नेशचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा सामना 90 मिनिटे चालला होता. एटीपी चँलेजर्स टूरवरील स्पर्धेतील प्रज्नेशचे हे सलग दुसरे उपविजेतेपद आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या कॅरे चँलेजर्स टनिस स्पर्धेतही त्याने उपविजेतेपद मिळविले होते. या यशामुळे प्रज्नेशने 137 मानांकन गुण मिळविले आहेत.









