किसान संघर्ष समितीचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हे सर्व कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठिय्या मारून बसलेले आहेत. यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी आतापर्यंत शेतकरी नेत्यांच्या बारा वेळा चर्चा झाल्या. परंतु त्यातून अद्यापही तोडगा निघालेला नाही. आंदोलनाचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर मार्च काढण्याचे जाहीर केलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर शहरामध्ये ट्रॅक्टर मार्च काढून ध्वजसंचलन करण्यात येणार आहे.
दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून ट्रॅक्टर मार्च ध्वजसंचलन करत कोल्हापूर शहरातून सकाळी 11 वाजता निघणार आहे. तरी यामध्ये शेतकऱयांनी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रक्टर मार्च व ध्वजसंचलन कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कॉम्रेड नामदेव गावडे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, वसंतराव पाटील, बाबुराव कदम, वाय. एन.पाटील, रवी जाधव, नामदेव पाटील, संदीप देसाई, रघुनाथ कांबळे, संभाजी जगदाळे, दिनकर सूर्यवंशी, दिलदार मुजावर, बाळू पाटील आदींनी केले आहे.