प्रतिनिधी /बेळगाव
कॉलेजरोड येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम झाला. बसवाणगल्ली येथील कालिका मंदिरात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंजुषा गिजरे, ट्रस्टी विद्या पत्तार उपस्थित होत्या. संपत्ती बेहनजीनी कार्यक्रमाची सुरूवात केली. यावेळी सेवा केंद्राच्या साधना बेहेनजी यांनी मकर संक्रांती आणि हळदीकुंकूचे अध्यात्मिक महत्त्व विशद केले.
यावेळी डॉ. मंजुषा गिजरे यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली. तर डॉ. कौमुदी पाटील यांनी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन सविता बेहेनजी यांनी केले.