आरोग्य सेवेसाठी बुस्टरसह करदात्यांना वन टाईम सिगंल विंडो
प्रतिनिधी /फोंडा
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थिती सावरण्यासाठी आरोग्य सेवेचा बुस्टर डोस दिलेला आहे. करदात्यांना एक वेळची खिडकी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रदान केलेली आहे. करदात्यांना त्याच्या प्राप्तीकर रिटर्न्समध्ये कोणतीही तफावत किंवा चूक आढळल्यास दोन वर्षाच्या आत दुरूस्त करण्यासाठी एक वेळची विंडो दिलेली आहे. अर्थमंत्र्यांनी करदात्यांसाठी एक नवीन कर नियम जाहीर केला ज्यामध्ये करदात्याने संबंधित मुल्याकन वर्षाच्या समाप्तीपासून दोन वर्षाच्या आत कर भरण्यावर अनियमित रिटर्न दाखल करू शकतात.
सहकारी संस्था, विद्यार्थी हित जपत डीजीटल चलनाचा अर्थसंकल्प
सहकारी संस्थाना अर्थसंकल्प फायद्याचा ठरणारा असून सहकारी संस्थासाठीचा किमान पर्यायी कर (मॅट) सध्याच्या 18.5 टक्के वरून खाजगी कंपन्याच्या बरोबरीने कमी करून 15 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे सहकारी संस्थाच्या महसुलात वाढ होईल. शिक्षणासाठी एक वर्ग, एक टिव्ही चॅनेल कार्यक्रम ‘पीएम ई विद्या’ चा एक वर्ग, एक टिव्ही चॅनल कार्यक्रमाअंतर्गत 12 वरून 200 टिव्ही चॅनलवर वाढवून सर्व राज्याचे इयत्ता पहिली ते बारावी पर्यत प्रादेशिक भाषामध्ये पुरक शिक्षण प्रदान अर्थसंकल्प. रिअल ईस्टेट क्षेत्राला बुस्ट देण्यात आलेला आहे. स्टार्टअपसाठी पुढाकार घेणाऱयांना एक वर्षासाठी कर सवलती प्रदान केल्या आहेत. 2022-23 या आर्थिक ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजीटल रूपया जारी करून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना दिलेली आहे. अर्थसंकल्पात एमएसएमई आणि इंडिया इंक स्टार्टअपसाठी काही विवेकपुर्ण पुढाकार घेण्यात आला आहे.
आरोग्य सेवेचा बुस्टर डोस
आरोग्य सेवेसाठी बुस्टर डोस अर्थसंकल्पात राष्ट्रीय टेलीमॅटल हेल्थ कार्यक्रमाचा प्रस्ताव आहे. जी व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक कल्याणाला पाठिंबा देण्यासाठी एक मजबूत पाऊल म्हणून अंमलात येईल. दर्जेदार मानसिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवामध्ये अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश करण्यासाठी, राष्ट्रीय टेली मॅटल हेल्थ कार्यक्रमामुळे मानसिक आारोग्य सेवेच्या प्रवेशातील मोठी तफावत भरून काढण्यात महत्वाची भूमिका बजावेल.









