प्रतिनिधी -इस्लामपूर
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांना बेड कमी पडू नये, यासाठी प्रकाश हॉस्पिटलमध्ये १०५ बेड वरून ६५० बेडला जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली आहे. यामध्ये ६५ बेडना शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी परवानगी मिळाली आहे. एकाच छताखाली सर्व सोयीनियुक्त असलेले पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल, असल्याची माहिती प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, २०२० मधील कोरोनाच्या काळात प्रकाश हॉस्पिलटने कोरोना संसर्ग रूग्णांची उत्तमरित्या काळजी घेतली होती. त्याकाळात ६५५ रुग्णांच्यावर उपचार करण्यात आले होते. सध्या कोरोनाची दुसरी लाट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या लाटेतनागरिकांचे बेड विना हाल होवू नये, यासाठी प्रशासनाने प्रकाश हॉस्पिटलची पाहणी केली. यामध्ये प्रशासनाने प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या ६५० बेडना परवानगी दिली आहे. यामध्ये ६५ बेडना शासनाच्या महात्मा फुले आरोग्ययोजनेसाठी परवानगी मिळाली आहे. उर्वरीत बेड हे शासकीय नियमाप्रमाणे निश्चीत केलेल्या दराप्रमाणे उपलब्ध होणार आहेत.
गेल्या वर्षी जो ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. तो आता भासणार नाही. हॉस्पिटलध्ये १३ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. ऑक्सिजन पॅनिक शुगरची तपासणी करण्यासाठी ८० मॉनिटर आहेत. तसेच एकाच छताखाली लॅब, एच.आर.सी.टी, आरटीपीसीआरची सोय असल्यामुळे रूग्णांना २४ तासात अहवाल प्राप्त होणार आहे. याचा वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव यासह मिरज पश्चिम भागातील नागरिकांना लाभ होणार आहे.
पाटील पुढे म्हणाले, नॉनकोविड रूग्णांसाठी ही लोकनेते राजारामाबापू पाटील हॉस्पिटलमध्ये सोय करण्यात आली आहे. यामध्ये विविध आजारांवर येथे उपचार होणार आहेत. प्रकाश हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या लसीकरणामध्ये एका महिन्यात ८०० लोकांना कोव्हीशिल्ड व कोव्हॉक्सीनची लस दिली आहे. कोरोना संसर्ग झालेला रूग्ण व त्यांचे नातेवाईक घाबरून जावू नयेत म्हणून हॉस्पिटलच्यावतीने समुपदेशन करण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
कोरोना काळात रुग्णांच्या नातेवाईकांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहेत. याची माहिती वेळेत मिळत नव्हती, त्यामुळे अनेक रुग्ण दगावले. यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने सहाय्यता कक्ष तयार करण्यात आले आहेत. यामध्ये बेडची उपलब्धता कोठे होणार, रेमडीसिवर औषधाची उपलब्धता करुन देणे, तसेच नातेवाईकांचे कॉन्सिलिन करण्यात येणार आहे.यासाठी या विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी टोल फ्री नं १८००२६६२५२६ संपर्क करण्याचे आवाहन नगराध्यक्ष पाटील यांनी केले.
यावेळी डॉ.अभिमन्यु पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








