पुणे विभाग शिक्षक मतदार संघाला प्रथमचं मिळणार सक्षम नेतृत्व
प्रतिनिधी/सातारा
गेली 26 वर्षे शिक्षण क्षेत्रात विविध प्रश्नांसाठी झटणाऱया प्रकाश पाटील यांचा सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिह्यात अफाट जनसंपर्क आहे. यामुळे शिक्षक मतदार संघातून ते भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी पुरक ठरणार आहे. अनेक शिक्षक, शिक्षण संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी आजपर्यंत केलेली मदत यामुळेचं त्यांच्या उमेदवारला मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे दिसते.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघात प्रकाश पाटील हे सर्व परिचित असे एकमेव उमेदवार म्हणून असून इतरांपेक्षा त्यांनी प्रचारात ही मोठी आघाडी घेतली आहे. यातून प्रकाश पाटील यांना ‘पसंती-1′ चे मत देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार शिक्षक मतदारांनी केल्याचे दिसते.
शाळा, महाविद्यालये, तंत्रनिकेतन, निवासी संकुल, मॅनेजमेंट इन्स्टिटयूट, अनेक शिक्षणेत्तर संस्था यांच्याशी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रकाश पाटील यांचा गेली कित्येक वर्षे कोणत्याना कोणत्या कामानिमित्त संपर्क येत होता. यातून त्यांच्या नेतृत्व कौश्यल्याची ओळख झाल्याने त्यांनी शिक्षक मतदारांचे प्रतिनिधीत्व करावे, असा आग्रह वाढला. अनेकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना महाविद्यालयीन शिक्षणापासून नेतृत्वाची संधी मिळत गेली. आजपर्यंत कोणत्याही प्रश्नाला सकारात्मक पर्याय मिळवून देण्यात ते चांगलेच माहिर असल्याचे सर्वज्ञात आहे. यामुळे सध्याच्या प्रचारा दरम्यान त्यांना संस्थापक आणि शिक्षकांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसते.
सिंहगड इस्टिटूटचे संचालक असणाऱया प्रकाश पाटींल यांनी पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदावर २००५ ते २००2015 या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामामुळे त्यांचा विजयी होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सध्या शिक्षण संस्थेबरोबर शिक्षकांच्या अनेक प्रश्नांसाठी लढवया नेतृत्वाची गरज आहे. आत्तापर्यंत ज्यांनी नेतृत्व केले, त्यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी काहीच केले नसल्याचा राग मतदारांमध्ये दिसतो. सामान्य कुटूंबातील प्रकाश पाटील हे सर्वांना ‘आपला माणूस’ वाटतात. त्यांच्या सारखे सक्षम नेतृत्व मिळणार असल्याने त्यांना आमचा बिनशर्त पाठिंबा असल्याचे विविध संघटनेच्या शिक्षकांनी “तरूण भारत”शी बोलताना सांगितले.
शिक्षक मतदार संघाला यापुर्वी सक्षम नेतृत्व मिळाले नसल्याने शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न प्रलंबित आहेत.पुणे विभागाला आता सक्षम नेतृत्व प्रकाश पाटील यांच्या रूपाने मिळणार असल्याने सर्व शिक्षण संस्थांमधून त्यांना वाढता पाठिंबा मिळाल्याने निकालाचे चित्र स्पष्ट होवू लागल्याचे दिसते.त्यांच्या विरोधी उमेवारांकडे प्रचारासाठी मुद्दे नाहीत तर काही जणांनी प्रकाश पाटील यांच्या प्रचाराचा झंझावत आणि त्यांना सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिह्यातून मिळणारा पाठिंबा पाहून आत्ताच माघार घेतल्याचे लक्षात येवू लागले आहे.
“शिक्षण क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्रासोबत केलेल्या कामामुळे विविध क्षेत्रातील लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यातून शिक्षक आणि शिक्षण संस्थांचे प्रश्न निकाली काढण्यास आजपर्यंत काम करत आलो आहे. विधिमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली तर अधिक प्रभावीपणे काम करता येईल,”अशी प्रतिक्रिया पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश राजाराम पाटील यांनी तरुण भारत शी बोलताना दिली
Previous Articleजगाला आता अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सची चिंता
Next Article हातकणंगले येथे एकाच रात्री तीन घरफोड्या









