प्रतिनिधी/ पणजी
मागोचे विधानसभेचे उमेदवार मेरशीचे पंच सदस्य प्रकाश नाईक यांच्या हत्या करण्यात आली त्याची सखोल चौकशी करावी. यात एका मंत्र्यांच्या भावाचा हात असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची पारदर्शक चौकशी करुन दोशिवर कारवाई करावी तसेच काँगेसने मंत्री माविन गुदिन्हो यांच्या राजीनाम्याची rमागणी केली आहे. आम्ही मगोतर्फे त्याचा राजीनाम्याची मागणी करत आहे, असे sयावेळी मागोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषद सांगितले.
सध्या राज्यात जमिन माफियाची गुन्हे वाढत आहे. 2002 पासून जमिनी माफिया स्थानिक पंच सदस्यांना धमकी देऊन त्यांच्या जागेवर वीज पाणी घेण्यासाठी त्यांना धमकी देत आहेत. प्रकाश नाईक यांची आत्महत्या नसून खून आहे. मुख्यमंत्र्यांनी दोषिंना ताबडतोब पकडावे. त्यांनी मगो पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश का केला त्याला कसले आमिश दाखविले होते याची चौकशी करावी असे ढवळीकर म्हणाले.
जमिन माफिया गुन्हे वाढत आहे. शिरोडातील आमदार सुभाष शिरोडकर, दिपक ढवळीकर यांनी मोठय़ा प्रमाणात त्रास देण्यात आला होता. जमीनच्या रुपांतरणासाठी जमीन मालकांना त्रास दिला जात आहे. यामुळे आत्महत्या खून अशी प्रकरणे वाढणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची योग्य शहानिश करणे गरजेचे आहे.
विकासकामांना मंत्रीच आड येतात
विकासाची कामे ही एनजीओ अडवत नाही तर सरकारमधील काही मंत्री बंद पाडतात. माझा मडकईतील एक प्रकल्प सरकामरधील मंत्र्यांने बंद पाडले. तसेच वास्को खांडेपार कुर्टी असे अनेक प्रकल्प आज अर्धवट आहे. आज गोव्यात अनेक अर्धवट प्रकल्प आहे. मोप एक प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. सेव्हरेज प्रकल्प पूर्ण होता नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एनजीओला दोषि ठेवण्यापेक्षा सरकारमधी मंत्री तसेंच सरपंच पंच सदस्यही याला जबाबदार आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी ढवळीकरांनी
पाण्यासाठी जलस्त्रात खात्याचे योग्य नियोजन नाही
तिसवाडी येथे मुख्यमंत्र्यांनी 27 एमएलडी प्लांट सुरु केला मुख्यमंत्र्यांचे स्वागता करतो. तरी सूद्धा तिसवाडी आणी फोंडाच्या लोकांना पूर्ण पाणी मिळणार नाही. 27 एमएलटी आम्हाला पाणी पुरवणार नाही आम्हाला येथे 30 एमएलडी पाणी दिवसाला पाहिजे. महिन्याला 900 एमएलडी पाणी आम्हाला पाहिजे तेवढे पाणी मिळत नाही. जलस्त्राsत खात्याचे योग्य नियोजन दिसत नाही.
26 रोजी खांडेपार येथे आंदोलन
म्हादईच्या आंदोलनाला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून सुमारे 650 लोकांनी आंदोलनाला उपस्थिती होती. आता पुन्हा सगळय़ा मतदारसंघातील उमेदवार तसेच लोकांनी म्हादईच्या सर्वेधनसाठी सगळय़ांनी एकत्र यावे 26 तारखेक खांडपार येथे पारंपारिक जलसंवधर्नासाठी एकत्र यावे सकाळी 10.30 वा. खांडेपार ओपा येथे हे आंदोलन होणार आहे. सगळय़ांनशी एकत्र यंऊन म्हादईचे sसंवर्धन करावो राज्यपाल म्हादई प्रश्नी गंभिर असल्याचे आम्ही त्यांचे आभार मानते. उन्हाळय़ात पाण्याची कमरता वाढत आहे. अजून हे अर्धवट काम आहे.









