मुंबई / ऑनलाईन टीम
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली. राज्यपालांनी रिपोर्ट पाठवला नाही तर हे सर्वपक्षीय आहे असं आम्ही समजू असंही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या राजकारणातील गुन्हेगारी घटक आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्याला चालवत असल्याचं दिसत आहे. अनेक गावांमध्ये आदिवासी, अनुसूचित जातींच्या लोकांची हत्या केली जात आहे. पण त्याची साधी चौकशी नाही अशी परिस्थिती आहे.








