मेथीची भाजी, पराठे तुम्ही नेहमीच खाल्ले असतील. मग आता मस्तपैकी मेथी पुलाव करून बघा.
साहित्य : दोन कप बासमती तांदूळ, बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट अर्धा चमचा, आठ ते दहा काजू, लाल तिखट दोन चमचे, थोडं जीरं, गरम मसाला, कढीपत्त्याची पाच ते सात पानं, तेल आणि मीठ.
कृती ः सर्वात आधी भात शिजवून घ्या. थोडा थंड होऊ द्या. एका कढईत थोडं तेल घाला. गरम झाल्यावर जीरं आणि कढीपत्ते घाला. मग कांदा घालून परतून घ्या. आलं-लसूण पेस्ट घाला. यानंतर टोमॅटो घाला. टोमॅटो शिजल्यावर त्यात तिखट आणि गरम मसाला घाला. चवीनुसार मीठ घाला. काजूही घाला.थोडं तेल सुटल्यावर मेथी घाला. मेथी पाच ते दहा मिनिटं झाकण ठेऊन शिजवून घ्या. मेथी शिजल्यानंतर शिजवलेला भात घालून परतून घ्या. कढईवर झाकण ठेऊन दोन मिनिटं शिजू द्या. गॅस बंद करा. मेथी पुलाव तयार आहे. हा पुलाव रायत्यासोबत खाता येईल.









