नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जगासोबत देशात लॉकडाऊनची घोषणा मागील काही महिन्यांपासून करण्यात आली आहे. याच दरम्यान भारतामधील ग्रामीण दुर्गम क्षेत्रामधील आर्थिक सेवा पुरवणाऱया साखळीला अनेक समस्यांना तेंड द्यावे लागले होते. परंतु या कठीण प्रसंगातही चांगले काम वित्तीय सेवांनी केले असल्याचे समोर आले आहे. सदरच्या संकट काळात भारतीय पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी)देशातील अतिदुर्गम क्षेत्रांतील गोरगरीबांच्या घरांपर्यंत आर्थिक सेवा देण्यात यशस्वी झाल्याची माहिती नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी सांगितले आहे. कोविड19 च्या महामारीच्या दरम्यान डिजिटल वित्तीय योजनाकडून देण्यात आलेल्या सेवेचा दाखला घेत भारताकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचेही स्पष्टीकरण कांत यांनी दिले आहे. पोस्ट पेमेंटच्या मदतीने ग्रामीण आणि बँकिंग सुविधांच्या आधारे दूर्गम क्षेत्रातील 21 लाख व्यवहारांमधून 24 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत 5.4 कोटी डॉलर म्हणजे 408 कोटी रुपये पोहोचविण्यात आले आहेत. देशातील 112 जिल्हय़ांमध्ये तंत्रज्ञान बाजाराता मोठा बदल घडवून आणला जाणार असून या कामासाठी एजंटांकडून संगणक, मोबाईल फोन आणि सूक्ष्म एटीएमचा वापर केला जाणार असल्याचे सीईओ कांत यांनी सांगितले आहे.









