चित्ररथांसाठीही मंडळांची धावपळ : दोन वर्षांनी विपेत्यांना मिळाले भाडे
प्रतिनिधी /बेळगाव
शिवजयंती अवघ्या चार दिवसांवर आली असल्याने शिवजयंती उत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. चित्ररथावर सादर करण्यात येणारा प्रसंग निश्चित झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा असतो तो पोषाख. पात्रांच्या साईजप्रमाणे पोषाख मिळणे शेवटच्या टप्प्यात कठीण असल्याने आधीपासूनच मंडळे तयारीला लागतात. बेळगावमध्ये पोषाख उपलब्ध करून देणारे पाच ते सहा विपेते असून, त्यांच्याकडे मंडळांच्या पदाधिकाऱयांची धावपळ सुरू आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे शिवजयंती होऊ शकली नाही. त्यामुळे शिवजयंतीसाठी लागणारे पोषाख भाडय़ाने देणाऱयांचे मोठे नुकसान झाले. यावषी उत्साहात शिवजयंती साजरी होणार असल्याने मंडळांनी आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. प्रत्येक पात्र हे ऐतिहासिक काळाप्रमाणे दिसावे यासाठी मंडळांकडून तशीच वेशभूषा केली जाते. पोषाख त्या पात्राप्रमाणे मिळण्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱयांची धावपळ सुरू आहे.
पोशाख व युद्ध साहित्याला मागणी
शिवजयंती उत्सव मंडळे चित्ररथावर जो प्रसंग सादर करतात त्याप्रमाणे पोशाख भाडय़ाने घेतात. बेळगावमध्ये शिवजन्मकाळापासून ते राज्याभिषेक काळापर्यंतच्या सर्व प्रसंगांचे पोशाख उपलब्ध आहेत. मुघल सैनिक, इंग्रज सैनिक यांच्या पोषाखाला अधिक मागणी आहे. याचबरोबर तलवारी, ढाल, धनुष्य, भाले हे युद्ध साहित्य उपलब्ध आहे. इतर पात्रांसाठी लागणारे वीणा, संबळ, राजदंड, अब्दागिरी, तुतारी, मोत्यांच्या माळा, कर्णफुले, महिलांच्या साडय़ा, बडिबेगमच्या विशेष साडय़ा, यासह इतर साहित्य उपलब्ध आहे.
डीजेमुळे व्यवसायाला झळ
शिवजयंतीची पारंपरिकता टिकवून ठेवण्यासाठी काही मंडळे दिवसरात्र मेहनत करून शिवचरित्राचे प्रसंग सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे डीजे लावून थिरकण्यासाठी काहीजण प्रयत्नशील आहेत. डीजे लावणाऱया मंडळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चित्ररथांची संख्या कमी होत आहे. डीजेमुळे मिरवणुकीतील इतर मंडळांना प्रसंग सादर करण्यास अडचणी येत असल्याने काही मंडळांनी चित्ररथ काढणेच बंद केले आहे. चित्ररथांची संख्या कमी झाल्यामुळे याचा परिणाम पोषाख भाडय़ाने देणाऱया व्यवसायाला होत आहे.
आतापर्यंत 15 मंडळांकडून बुकिंग
मागील दोन वर्षात कोणतेही मोठे सांस्कृतिक कार्यक्रम झाले नसल्याने व्यवसाय अडचणीत होता. परंतु शिवजयंतीमुळे पुन्हा एकदा पोशाख व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. आतापर्यंत 15 मंडळांनी बुकिंग केले आहे. अजून 10 मंडळे येण्याची शक्मयता आहे. मिरवणुकीत डीजे लावले जात असल्याने चित्ररथांची संख्या कमी होत असल्याने व्यवसायाला फटका बसत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
– प्रवीण भातकांड (पोशाख विपेते)