प्रतिनिधी/ बेळगाव
पोलीस हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमिवर बुधवारी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. कोविड-19 मार्गसुचीनुसार पोलीस मुख्यालयातील मैदानावर हा कार्यक्रम झाला.
बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, चंद्रशेखर निलगार आदी अधिकाऱयांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.









