प्रतिनिधी/ पणजी
पणजी पोलीस स्थानकावरील हल्लाप्रकरणी सादर केलेल्या आरोपपत्रावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यास सात वर्षे झाली. सदर याचिकेचा लवकर निकाल लावावा म्हणून ऍड. आयरीश रॉड्रीग्स यांनी सादर केलेल्या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे. ऍड. आयरीश यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून आपले पत्र सुमोटो जनहित याचिका म्हणून नोंदवून घ्यावे, अशी विनंती त्यांनी या याचिकेत केली आहे.