चिपळूण
खेर्डीतील मार्केटिंग कंपनीने ग्राहकांची फसवणूक केलाचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांचे एक विशेष पथक कंपनीच्या संचालकांच्या मागावर असून संचालकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी जाळे विणण्यास सुरूवात केली आहे.
नोकरी व कमिशनचे आमिष दाखवत शहरालगतच्या खेर्डी येथील श्री स्वामी समर्थ कृपा एंटरप्रायझेस या मार्केटींग कंपनीच्या माध्यमातून संचालक संजय चव्हाण याने 23 जणांची 23 लाख 73 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडीस आला होता. या संदर्भात कैलास मालुसरे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानुसार चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारानंतर आतापर्यंत 106 जणांनी तक्रारी दिल्या असून फसवणुकीची रक्कम 32 लाखापर्यंत पोहचली आहे. संचालक संजय चव्हाण या प्रकारानंतर गायब असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या चौकशीतच महत्वाची माहिती पोलिसांना प्राप्त होणार असून त्याच्या शोधासाठी चिपळूण पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण करीत आहेत.









