प्रतिनिधी/ पणजी
काही दिवसांपूर्वी विदेशातून दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या आपल्या मित्राचे स्वागत करुन त्याला आपल्या गाडीतून आणल्यानंतर थेट पोलिस खात्यात दाखल झालेल्या पोलिसाचा तो मित्र कोरोना पोझिटीव्ह सापडल्याने पोलिस खात्यात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रसंग अनेक दिवसांपूर्वी घडला होता. या पोलिसाचा मित्र जेव्हा दाबोळीवर उतरला होता तेव्हा त्याची तपासणी झाली असता तो कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे सदर पोलीस बिनधास्तपणे कामावर रुजू झाला होता. मात्र नंतर काही दिवसांनी तोच मित्र कोरोनो पोझिटीव्ह असल्याचे चाचणीत स्पष्ट झाल्याने पोलिस खात्यातील कर्मचारी व अधिकाऱयांची तारांबळ उडाली. तेव्हपासून सदर पोलिसाला विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे.
याबाबत रविवारी सायंकाळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असते ते म्हणाले की याचा तसा फारसा प्रभाव पडणार नाही. कारण मूळ रुग्णामधून दुसरा व दुसऱयामधून तिसरा असे होईपर्यंत त्याचा प्रभाव खूप कमी झालेला असतो. तरीही पोलिसांनी स्वतःची चाचणी करुन घेतल्यानंतर त्यात त्यांना काहीही सापडले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.









