प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील पोलिस दलामध्ये गेल्या महिनाभरापासून कोरोना बाधित कर्मचाऱयांची संख्या वाढत आह.s आतापर्यंत 54 कर्मचारी अधिकारी व त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित सापडले आहेत. जिह्यातील अशा कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱयांची काळजी घेता यावी व कोरोनाला हरवून ते या युध्दात पुन्हा सामील व्हावे यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी 50 बेडचे खास पोलिसांसाठी कोवीड सेंटर पोलिस मुख्यालयात सुरू केले. पोलिसांनी पोलिसांसाठी सुरू केलेला हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
आतापर्यंत जिह्यात 54 पोलीस कर्मचारी अधिकारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोविड बाधित झाले आहेत. एकटय़ा शहर पोलीस ठाण्यातील 11 कर्मचारी बाधित झाले आहेत. कायदा व सुरक्षिततेचे काम करत असताना ही लोक नागरिकांच्या संपर्कात येत आहेत. पोलिस कर्मचारी बाधित होत असल्याने त्याचा ताण पोलिस यंत्रणेवर पडत आहे. रत्नागिरी शहर व ग्रामीण पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱयांना आरोपी तसेच तपास करण्याच्या दृष्टीने मृतदेहांचा पंचनामे करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जावे लागते यातूनही पोलिसांना संसर्ग वाढत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी कर्मचाऱयांच्या काळजीपोटी 50 बेडचे कोविड सेंटर उभे केले आहे. पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी उचलले हे पाऊल राज्यासाठी आदर्शवत ठरत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी कोविडचा अनुभव स्वतः घेतला आहे. अशा वेळी काय करावे व काय करू नये यांची पूर्ण कल्पना त्यांना असल्याने अनुभवाचा फायदा या लोकांना होणार आहे. आपल्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
बाधीत पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची घरच्यांप्रमाणे देखभाल व काळजी घेतली जाणार आहे. त्यांना पुन्हा कामावर हजर होण्यासाठी सुदृढ बनवलं जाणार आहे. काही वेळा पोलीस खात्यात काम करत असल्यामुळे पती पत्नी दोघे ही बाधित निघतात. अशा वेळी त्यांची काळजी घेणे आवश्यक असत.s पण त्याच बरोबर त्याच्या कुटुंबातील सदस्य ही एखाद्या वेळी बाधित झाला तर त्यांची काळजी घेणे ही तितकीच आवश्यक असते. पोलीस कर्मचाऱयांच्या कुटुंबातील लोकांची काळजी व धीर देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे पुढे सरसावले आहेत.
महाराष्ट्रातील एक पहिलाच आगळावेगळा उपक्रम रत्नागिरी जिह्यात राबविला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना मानसिकदृष्टय़ा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य नक्कीच वाढून ते जोमाने कामाला लागतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 50 बेडचे हे कोविड सेंटर बुधवारपासून कार्यान्वित झाले आहे. समाज कल्याण भवनातील 8 पोलीस कर्मचारी याठिकाणी शिप्ट केले जाणार आहेत. त्यांना याठिकाणी निरीक्षणाखाली काही दिवसासाठी ठेवले जाणार आहे.
शासकीय रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली होणार उपचार
या कोविड सेंटरमध्ये पॉझीटीव्ह आहेत मात्र लक्षणे नाहीत असे व उपचारानंतर निरीक्षणाखाली ठेवल्या जाणाऱया बाधीतांना दाखल केले जाणार आहे. दिवसातून दोन वेळा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर येथे भेट देऊन रुग्णांना तपासणार आहेत. तसेच अगदीच गरज असेल तर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरची देखभाल एक पोलीस अधिकारी करणार आहे. रुग्णांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी ते समन्वयकाची भुमिका निभावणार आहेत.









