सातारा / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील पांडे येथे यात्रेला बगाड काढण्यास पोलीस आणि प्रशासनाने ग्रामस्थांना मनाई केली होती. परंतु, रविवार दि. 16 रोजी दुपारी गावात भैरवनाथाच्या मंदिरासमोरच बगाडाची मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती भुईंज पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वेळीच तेथे पोहचून तब्बल 50 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
पांडेची बगाड यात्रा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात दि.28 च्या दरम्यान होती. ती यात्रा कोरोनाचा प्रादुर्भाव रद्द करण्याचा आदेश दिला गेला. गावात त्यावेळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी ग्रामस्थांना विनंती केली होती. त्यामुळे त्यावेळी यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, रविवार दि. 16 रोजी पोलिसांना चकवा देत गावात बगाड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याची काणकूण भूईंज पोलिसांना मिळाली. भुईज पोलीस पांडे गावात पोहचल्यानंतर बगाड काढल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन बगाड काढणाऱ्या 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामध्ये अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दि.16 रोजी दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान बगाड काढल्याप्रकरणी सत्यम राजेंद्र पवार, ओंकार दिलीप जाधव, आदित्य मोहन खराडे, प्रसाद दशरथ जाधव, तुषार सावंत, गणेश अरुण यादव, हरिश्चंद्र रामचंद्र पवारयांच्यासह काही अनोळखी लोकांनी पांडे ते खानापूर या रस्त्यावरुन बगाड्याची मिरवणूक काढली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्यामुळे कलम 188, 269, 270 तसेच प्राणी कलम कायदा 1960 चे 11(1) अ नुसार भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी धायगुडे तपास करत आहेत.









