प्रतिनिधी / पणजी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याची आपल्याला जाणीव आहे. काही पोलीस कर्मचाऱयांनाही कोरोना व्हायरसची बादा झाली असल्याचे अधिकाऱयांनी आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलीस खरोखरच चांगली कामगिरी बजावत असून त्यांच्या सुरक्षतेबाबत खबरदारी घेणेही तीतकेच जरुरीचे आहे असे नवोदीत पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिना यांनी सांगितले. पोलीस खात्याच्या कामकाजाला पत्रकार आणि जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे असेही मुकेश कुमार मिना म्हणाले.
काल शुक्रवारी मुकेश कुमार मिना यांनी गोवा पोलीस खात्याच्या पोलीस महासंचालक पदाचा ताबा स्विकारल्यानंतर दुपारी पहिली पत्रकार परिषेद घेतली यावेळी त्यांच्या सोबत पोलीस महिनिरीक्षक जस्पाल सिंग, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक परमादित्य व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिना पुढे बोलताना म्हणले की पोलीस काम करीत असताना धोका नेहमी असतो पण डय़ुटीही पार पाडणे तितकेच महत्वाचे असते. ज्या पोलीस कर्मचाऱयांना कोरोनाची बादा झाली आहे. त्यांना कशा पध्दतीने बाधा झाली याबाबत अभ्यात करून नंतर पोलिसांना किमान डय़ुटी बजावताना कोरोना व्हायरस पासून कसा बचाव करता येईल याबाबत काम करणार. इतर राज्यातही पोलीस कर्मचारी करोना विरोधात लढा देत आहे. त्या राज्यातील पोलीस काय खबरदारी घेतात त्याची माहिती मिळवणार आहे. कोरोना सारख्या महाभयंकर संकटाला तोंड देत डय़ुटी बजावत असताना पोलीस कर्मचाऱयांची सुरक्षता फार म्ह्त्वाची आहे असेही मुकेश कुमार मीना यांनी सांगितले. गोव्यात या पूर्वी आपण काम केले आहे. त्यामुळे गोव्यातील काही भागांची आपल्याला माहिती आहे. फोंडा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून आपण डय़ुटी बजाविली आहे असेही मुकेश कुमार मीना यांनी सांगितले. सध्याच्या पोलीस खात्याच्या कामकाजाबाबत आपण आपल्या अधिकाऱयांकडून माहिती मिळवित आहे. पोलीसांच्या बडत्या व अन्य काही कामे जी विविध कारणामुळे खोळबून राहिलेली आहेत त्यांना आपण लवकरच चालना देणार आहे. राज्यात पर्यटन व्यवसाय सुरु झाला असून गोव्यात येणाऱया पर्यटकांची सुरक्षेला आपण प्रधान्य देणार आहे. पोलीस खात्यात एएनसी, सीआयडी व अन्य विविध विभाग असून प्रत्येक विभागात चांगले कामकाज होणार आणि जनतेला त्याचे सहकार्य होणार याकडे आपण लक्ष देणार असल्याचेही मुकेश कुमार मिना यांनी सांगितले.









