प्रतिनिधी/ सातारा
कोरोणा विषाणूच्या धास्तीने लॉकडॉऊनचा कालावधी वाढला आहे. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर इतरत्र सर्व बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये सर्व बँक मर्यादित वेळेप्रमाणे खुल्या आहेत. पण नागरिकांनी आता बँकेतच गर्दी केली आहे. कोरोना विषाणूचा धोका टाळावायचा असल्यास सोशल डिस्टन्स पाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका किंवा गर्दी करू नका असे वारंवार प्रशासनातर्फे सांगण्यात येते. पण तरीदेखील गेल्या कित्येक दिवसांपासून बँकांमध्ये विविध कारणांमुळे नागरिकांची गर्दी होत आहे. हीच गोष्ट लक्षात घेत आता शाहूपुरी येथील बँकेच्या समोर पोलिसांनीच रेषा आखून नागरिकांनी तीन-तीन मीटरचे अंतर राखून रांगेत उभारण्यास सांगितले.
कित्येक वेळेस सांगून देखील नागरिक बँकांमध्ये गर्दी करीतच होते. त्यामुळे अखेरीस पोलिसांनाच हे पाऊल उचलावे लागले. पेन्शनच्या निमित्ताने, जनधन योजनेच्या निमित्ताने किंवा पैसे काढण्याच्या निमित्ताने आदी विविध कारणांमुळे बँकांमध्ये गर्दी होत आहे.








