टॅक्सी मालकांनाच टार्गेट केले जाते
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील टॅक्सी मालक संघटना आपल्या हक्कांसाठी लढा देत असल्याने प्रत्येक वेळी टॅक्सी मालकांनाच टार्गेट केले जात आहे. टॅक्सी मालक संघटनेचे बाप्पा कोरगावकर यांनी सांगितले. नेरुल येथे झालेल्या प्रकरणात टॅक्सी मालकांनी तक्रार दाखल केली असतानाही टॅक्सी मालकांनाच अटक केली होती. साधूला सोडून सन्याशाला फाशी असाच हा प्रकार असल्याने पोलिसांच्या या कामगिरीचा टॅक्सी मालक संघटना निषेध करीत असल्याचेही कोरगावकर म्हणाले.
काल मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत चेतन कामत, सुनिल नाईक, बबन कांदोळकर इतर टॅक्सी मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात कोविड19 महामारी सुरु असताना नेरुल येथे चित्रीकर सुरु होते. मोठय़ा संखेने त्याठिकाणी लोकांची उपस्थिती होती. 144 कलमांचे उल्लंघन केले जात होते. शिवाय मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्र पासींगच्या वाहने त्या ठिकाणी होती. हा सगळा प्रकार चुकीचा होता म्हणून अवघे काही टॅक्सी मालक त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे येऊ लागली त्यातच ताही प्रमाणात बाचाबाची झाली असता त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी (बाऊंसर) आम्हाला सळई दंडुक्यानी मारहाण करायला सुरुवात केली त्यात चार टॅक्सी मालक जखमी झाले होते. जखमींना इस्पितळात दाखल केले आणि आम्ही पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. मात्र नंतर प्रकार उलट झाला व टॅक्सी मालकांनाच अटक करण्यात आली. पोलीसांनी कोणाच्या दबावाखाली येऊन हा प्रकार केला असा प्रश्न कोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून टॅक्सी मालक संघनटना संपावर आहे. गोवा माईल्स रद्द करा ही एकमेव आमची मागणी आहे. आझाद मैदानावर संप सुरु असताना कोरोनाचे निमित पुढे करून आम्हाला परवांगी नाकारण्यात आली होती. प्रत्येकवेळी टॅक्सी मालकांना निषाण करून सरकार काय सिध्द करू पाहत आहे. असा प्रश्न टॅक्सी मालकांनी उपस्थित केला आहे. राज्यातील टॅक्सी चालक पर्यटकांना लुटतात असा आरोप दरवेळी आमच्यावर केला जातो. प्रत्येक्षात वस्तूस्थिती काय आहे याचा विचार कोणीच करीत नाही. टॅक्सीला मिटर बसविण्यासाठी आम्ही कधीच नकार दिला नाही. परंतून मिटर बसविण्याच्या अगोदर भाडे दर निच्छीत करा, मिटर बिघडल्यास पुढे काय व्यवस्था अशा प्रकारच्या काही गोष्टींचा खूलासा करा अशी आमची मागणी होती. सरकारने राज्यात गोवा माईल्स व इतर ऍपबेस टॅक्सी आणून राज्यातील टॅस्की मालकांचे कंबरडे मोडले आहे. एखाद्या हॉटेलच्या बाहेर आम्ही दिवसभर भाडे मिळणार याची वाट पाहत असतो. गोवा माईल्स टॅक्सी त्याच ठिकाणी येऊन प्रवासांना घेऊन जाते मग आम्ही काय करावे म्हणून गोवा माईल्स रद्द करा आमच्यावर विनाकारण होत असलेले आरोप चुकीचे आहेत. वास्तवीक पर्यटकांना टॅक्सी मालक लुटीत नाही तर हॉटेल लॉबी व टीटीएजी लुटीत असतात असा खुलासा टॅक्सी मालक संघटनेने केला आहे.









