प्रतिनिधी / बेळगाव
सुदृढ आरोग्य व फीट बेळगाव या हेतूने केएसआरपी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आयोजित करण्यात आलेली सायकल रॅली उत्साहात पार पडली. सुवर्ण विधानसौध समोरून या रॅलीला चालना देण्यात आली.
राज्य राखीव दलाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी ध्वज दाखवून सायकल रॅलीला चालना दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन आदी वरि÷ अधिकारी उपस्थित
होते.
पोलीसदल, बेळगाव सायकलिंग क्लब, एनसीसी, केएसआयएसएफ, अग्निशमन दल, वनखाते, सीआरपीएफ कोब्रा कॅम्प, आयटीबीपी, पॅरेथॉन बॉईज, बेळगाव पेडलर्स क्लब, डिव्हाईन मर्सी स्कूल, सीएमए-आयएएस प्रशिक्षण अकादमी, वेणुग्राम सायकल क्लब आदी 400 हून अधिक क्रीडाप्रेमींनी यामध्ये भाग घेतला होता. पिरनवाडी येथील राज्य राखीव दलाच्या बटालियनमध्ये रॅलीची सांगता झाली.









