स्टील-सिमेंट कंपन्यांना मंत्री नितीन गडकरी यांनी फटकारले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्टीलच्या किमती वाढत असल्याने आता ग्राहकांना व व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये घरांच्या किमती वधारणार असल्याची चिन्हे आहेत. व्यावसायिकांनुसार स्टीलच्या किमती वाढत गेल्याने घर निर्मितीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.
मागील एक वर्षाच्या दरम्यान मुंबईमध्ये स्टीलचा किरकोळ भाव 55 टक्क्यांनी वधारुन 58 हजार प्रति टन राहिला आहे. 1 जानेवारी 2020 रोजी पोलादाचा दर 37.5 हजार रुपये प्रति टन राहिला होता. ब्रोकरेज कंपनी इडलवाइजच्या माहितीनुसार घाऊक स्टीलच्या किमती मागील आठवडय़ात 2,750 रुपये प्रतिटनाने वाढल्या आहेत. याच्यानंतर पोलाद विक्रेत्यांनीही भाव वाढविले आहेत.
बांधकाम क्षेत्रात पोलादाचा सर्वाधिक वापर केला जातो. याचे प्रामुख्याने उत्पादन दक्षिण आणि पूर्व क्षेत्रातील लहान-मध्यम कारखान्यांमध्ये केले जाते. परंतु कोरोना प्रभावामुळे कामगारांची झालेली कपात आणि कच्च्या मालाचे गगनाला भिडलेले भाव यामुळे स्टील उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट राहिलेली आहे. याचा दुसरा परिणाम म्हणून सरकारी खाण कंपनी एनएमडीसी आर्यन यांच्या किमती मागील सहा महिन्यामध्ये 135 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
स्टीलच्या किमतीने सरकार काळजीत
वारेमापपणे स्टीलच्या किमती वाढल्याने सरकारची काळजी वाढली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्टील कंपन्यांसोबत सिमेंट कंपन्यांनाही फटकारले आहे.









