पोलादाच्या किंमती 20 टक्के कमी होणार ?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये पोलादाच्या किंमतीमध्ये भारतात 55 टक्के इतकी वाढ झाली आहे. या वाढीचा फटका विविध व्यवसायांना झेलावा लागत असून केंद्र सरकार वाढत्या पोलादाच्या किमतीवर नियंत्रण आणणार असल्याचे सांगितले जात आहे.
पोलादाच्या किमती नियंत्रित राहण्यासाठी आवश्यक ते उपाय येणाऱया काळात घेतले जाण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. येणाऱया काळात पोलादाच्या किमती 20 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्मयता सांगितली जात आहे. लोहखनिजाच्या पुरवठय़ावरचा ताण कमी केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पोलादाच्या आयातीवरील शुल्कही कमी केले जाण्याची शक्मयता आहे. यामुळे पोलादाच्या किमती कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्याच्या घडीला टीएमटी, वायर रॉडस् अशा प्रकारातील पोलादाच्या किमती टनामागे 50000 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही दखल घेतली असून यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले असल्याचे समजते. पोलादाच्या वाढलेल्या किमतीच्या परिणामामुळे पायाभूत सुविधांच्या खर्चावर ताण वाढत असल्याची बाब गडकरी यांनी नजरेस आणून दिली आहे.
किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे कंत्राट व्यवहारामध्ये फेरफार करण्याची गरज भासत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
पोलाद उत्पादकांच्या म्हणण्यानुसार अलीकडच्या काळामध्ये लोहखनिजाच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ झाल्याने पोलादाच्या किमतीमध्ये वाढ करणे अपरिहार्य ठरत आहे. लोहखनिज हा पोलाद उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक मानला जातो. पोलाद उत्पादक कंपन्यांनी लोहखनिजाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी मंत्रालयाकडे केली आहे. लोहखनिजावर लघुमुदतीसाठी बंदी आणण्याचा सरकारचा विचार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. पण दुसरीकडे फेडरेशन ऑफ इंडियन मिनरल इंडस्ट्रीजने याच्या निर्यातीवर बंदीची गरज नसल्याचे म्हटले आहे.









