प्रतिनिधी / खेड
पुणे येथून कोकणात पर्यटनासाठी आलेली कार मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातात चौघेजण बालंबाल बचावले आहेत. विशाल नंदू वरुते, अजिंक्य नंदू वरुते, तुषार नंदू वरुते, गणेश गाडे अशी किरकोळरित्या जखमी झालेल्यांची नावे आहेत. अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.









