वृत्तसंस्था/ गिडीनिया (पोलंड)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या पोलंड खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेल्जियमच्या मेरीना झानेवस्काने एकेरीचे जेतेपद पटकाविले. डब्ल्यूटीए टूरवरील झानेवस्काचे हे पहिले विजेतेपद आहे.
युक्रेनमध्ये जन्मलेल्या बेल्जियमच्या झानेवस्काने अंतिम सामन्यात स्लोव्हाकियाच्या ख्रिस्टीना कुकोव्हाचा 6-4, 7-6 (7-4) अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले.









