प्रतिनिधी / वास्को
पोर्ट टाऊन जेसीआयतर्फे गरजूंना जीवनावश्यक व साफसफाईच्या वस्तू प्रदान करण्यात आल्या.
ईस्टरनिमित्त पोर्ट टाऊन जेसीआयतर्फे बोगमाळो येथील वृद्धाश्रमाला भेट देण्यात आली. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू व साफसफाईच्या वस्तू प्रदान केल्या. माटवे दाबोळी येथील रोजंदारीवरील सुमारे तीस मजुरांना तांदळाच्या व पीठाच्या पिशव्या देण्यात आल्या. याप्रसंगी जेसीआय विभाग कार्यक्रम संचालक मल्लिकार्जुन कुकनूर, पोर्ट टाऊन जेसीआयचे अध्यक्ष गुरूनाथ मेटी व प्रकल्प संचालक स्मितेश तळावडेकर उपस्थित होते.









