लंडन : चँम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी येथे झालेल्या सामन्यात पोर्टो क्लबने इटालियन चॅम्पियन्स ज्युवेंट्सचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. पोर्टोचा ज्युवेंट्सवरील हा पहिला विजय आहे. दुसऱया एका सामन्यात बोरूसिया डॉर्टमंडने सेव्हिलावर 3-2 अशा गोलफरकाने निसटता विजय नोंदविला.
चॅम्पियन्सा लीग फुटबॉल स्पर्धेतील शेवटच्या 16 संघात स्थान मिळविण्यासाठी झालेल्या पहिल्या टप्प्यातील या सामन्यात पोर्टो क्लबतर्फे मेहदी तारेमी आणि मुसामॅरेगा यांनी प्रत्येकी एक गोल केला. ज्युवेंट्सतर्फे एकमेव गोल फेड्रिको चिसाने नोंदविला. आता उभय संघात 9 मार्च रोजी टय़ुरिन येथे परतीचा सामना होणार आहे. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात बोरूसिया डॉर्टमंडने सेव्हिलावर 3-2 अशी मात केली. डॉर्टमंडतर्फे हॅलेंडने दोन गोल नोंदविले. सामन्यातील पाचव्या मिनिटाला सेव्हिलाचे खाते सुसोने उघडले. 19 व्या मिनिटाला डॉर्टमंडला डेहोडने बरोबरी साधून दिली.









