ऑनलाईन टीम
पंतप्रधान मोदी( PM Modi) हे जगातील सर्वात मोठे धार्मिक संप्रदाय असलेल्या रोमन कॅथलिकांच्या (Roman Cathelic) प्रमुखाला भेट देणारे पाचवे भारतीय पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी त्यांच्या रोम भेटीचा एक भाग म्हणून पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांच्याशी बैठक घेण्यासाठी शनिवारी व्हॅटिकन सिटी (Vatican city) येथे आले आहेत.
इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी (Mario Dragi) यांच्या निमंत्रणावरून ते २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान व्हॅटिकन सिटीला भेट देत आहेत. पोप यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर होते. इटलीतील G20 शिखर परिषद आणि स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे COP26 हवामान शिखर परिषदेत उच्चस्तरीय बैठकींमध्ये पंतप्रधान मोदींचा व्यस्त आहेत.नोव्हेंबरच्या पहिल्या दोन दिवशी ते ग्लासगोमध्ये असतील.
काल, पंतप्रधान मोदींनी त्यांचे इटालियन समकक्ष मारियो द्राघी यांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा केली. आदल्या दिवशी इटलीमध्ये आलेले पंतप्रधान मोदी यांचे पलाझो चिगी येथे मारियो द्राघी यांनी दोघांच्या पहिल्या खाजगी भेटीसाठी स्वागत केले. त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








