जोधपूर / वृत्तसंस्था
राजस्थानमधील पोखरण फायरिंग रेंजमध्ये 105 एमएम तोफेची सराव चाचणी सुरू असताना एक गोळा जागेवरच फुटल्याने बीएसएफ जवान हुतात्मा झाला. तसेच अन्य तीन सहकारी जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री सैन्याच्या सरावादरम्यान ही दुर्घटना घडली. याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील चार दिवसातील पोखरणमध्ये 105 एमएम तोफेमुळे हा दुसरा अपघात झाला आहे. चार दिवसांपूर्वी तोफेची बॅरेल फुटल्यामुळे एक जवान जखमी झाला होता. पोखरणमधील फायरिंग रेंजमध्ये बीएसएफ जवानांचा सराव सुरू असताना हय़ा दुर्घटना घडल्या आहेत. राजस्थान सीमेजवळ किशनगडमध्ये ही बीएसएफची स्वतःची फायरिंग रेंज आहे.









