मुंबई
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने बिकानेर-टू भिवंडी ट्रान्स्को लिमिटेड या ऊर्जा प्रकल्पाचे नुकतेच अधिग्रहण करण्यात यश मिळवलं आहे. ऊर्जा वितरण प्रकल्पासाठी पॉवरग्रिड कॉर्पोरेशनकडून बोली लावण्यात आली होती, असे कळते. सदरची बोली पॉवरग्रिडने जिंकून बिकानेर-टू भिवंडी ट्रान्स्को लिमिटेडचे अधिग्रहण केले आहे. राजस्थानमध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा वितरण प्रणालीत अधिक मजबुती आणली जाण्याला येणाऱया काळात पॉवरग्रिडकडून प्रयत्न होणार आहेत. सदरचा प्रकल्प हा 400 किलोवोल्ट क्षमतेचा डबल सर्किट ट्रान्स्मीशन प्रणालीचा आहे. बांधा, मालकी प्रस्थापित करा, वापरा आणि देखभाल करण्याच्या 35 वर्षाच्या करारावर हा प्रकल्प अधिग्रहण करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.









