15 जण दगावले, सक्रिय रुग्णसंख्येतही घट
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. रविवारी जिल्हय़ातील 456 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 199 जणांचा समावेश आहे तर बरे होणाऱयांची संख्या वाढली असून रविवारी 1421 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण रुग्णसंख्या 70,678 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 59,558 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत जिल्हय़ातील सक्रिय रुग्णांची संख्या 10,484 होती. आठवडाभरापूर्वी ही संख्या 15 हजारांवर होती. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट होत आहे.
रविवारी 15 जणांचा मृत्यू झाला आहे. चिकोडी तालुक्मयातील 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रायबाग तालुक्मयातील 4, हुक्केरी तालुक्मयातील 2, बेळगाव, अथणी व सौंदत्ती तालुक्मयातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. बेळगावपाठोपाठ चिकोडी, खानापूर, हुक्केरी, रायबाग, सौंदत्ती तालुक्मयातही रविवारी रुग्णसंख्या अधिक होती.
आतापर्यंत जिल्हय़ातील 8 लाख 41 हजार 400 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 64 हजार 488 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 68 हजारहून अधिक जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. 2,083 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.
अगसगा, गणेशपूर, गौंडवाड, अतिवाड, कंग्राळी बीके, हिंडलगा, हुंचेनहट्टी, मुतगा, नंदिहळ्ळी, पंतबाळेकुंद्री, गणेशपूर, पिरनवाडी, हलगा, बस्तवाड, कल्लेहोळ, कंग्राळी खुर्द, कोळीकोप्प, खणगाव बीके, मच्छे, सांबरा, अष्टे, बडाल अंकलगी, मुचंडी, मुतगा, हुलीकट्टी, धामणे, भेंडीगेरी, होनगा, रणकुंडये, संतिबस्तवाड, बिजगर्णी, विजयनगर, हंगरगा, शहापूर, नेहरूनगर, न्यू वैभवनगर, ओमनगर, आझमनगर, महांतेशनगर, टिळकवाडी, हिंदूनगर, अनगोळ, रामतीर्थनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आदर्शनगर, हिंदवाडी, संभाजीनगर-वडगाव, संगमेश्वरनगर, शास्त्राrनगर, आनंदनगर, अंजनेयनगर, अशोकनगर, बसवन कुडची, खासबाग, भाग्यनगर, भारतनगर, भवानीनगर, बिच्चू गल्ली, बॉक्साईट रोड, नानावाडी, जुनेबेळगाव, गुरुप्रसादनगर, गुरुप्रसाद कॉलनी, वंटमुरी कॉलनी, शाहूनगर, महांतेशनगर, मजगाव, आंबेडकरनगर, मारुती गल्ली-बेळगाव, कणबर्गी, शिवाजीनगर, झाडशहापूर, श्रीनगर, ताशिलदार गल्ली, विनायकनगर परिसरातही नवे रुग्ण आढळून आले आहेत.
20 वाहने जप्त
विकेंड लॉकडाऊनच्या काळात अनावश्यकपणे फिरणारी 20 वाहने रविवारी पोलिसांनी जप्त केली आहेत. विनामास्क फिरणाऱया 177 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.









