कोल्हापूर प्रतिनिधी
बिल्डो 2022 या भव्य प्रदर्शनाकडे पाहत असताना असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् ऍन्ड इंजिनिअर्सच्या पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रत्यय येत आहे., कोरोना जाणार असल्याने, या पॉझिटीव्ह थिंकिंगमुळेच बिल्डो 2022 हे प्रदर्शन यशस्वी रित्या भरवले आहे.,. असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले..रविवारी त्यांनी या प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. या वेळी ते बोलत होते. या वेळी त्य़ांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कोरोनांतर झालेल्या या पहिल्या प्रदर्शंनाला रविवारी लोकांची मोठी गदीं झाली होती. आज या प्रदर्शनाची सांगता होत आहे.
नाम. पाटील पुढे म्हणाले, परीख पुलाचे नुतनीकरण आणि समांतर पर्यायी पुलाची निर्मिती करण्यासाठी डी पी. आर ला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे रेल्वेचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील. याचे सर्व श्रेय हे असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् ऍन्ड इंजिनिअर्स असोसिएशनचे आहे.. कारण परीख पुलाच्या प्रश्नासाठी ही संस्था पहिल्यापासून प्रयत्नशील होती. असोसिएशानच्यावतीने कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने नेहमीच विविध उपक्रम सुरु असतात. गेल्या 3 वर्षापासून कोविडमुळे संपूर्ण राज्य व देश आर्थिक संकटात होता. आज कोरोनाचे संकट दूर होऊन अर्थचक्राला गती येत आहे. याचा अंदाज घेऊन चालू वर्षी बिल्डो 2022 हे प्रदर्शन भरवण्याचे धाडस दाखवले आहे. हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले येत्या तीन वर्षात राज्यात एक प्रगतीशील जिल्हा म्हणून कोल्हापूर जिह्याला ओळखले जाणार आहे. याचे करण म्हणजे, रत्नागिरी – कोल्हापूर राज्य मार्ग, विमानतळाचा विस्तार, कोल्हापूर गगणबावडा राज्य मार्ग हे सर्व प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होणार आहेत. कोल्हापूरला पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्यासाठी आंबा सारख्या ठिकाणाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. केवळ आंब्यात 1000 ते 1200 लोक राहू शकतात एवढी रीसॉर्टसची संख्या या ठिकाणी आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत ते म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही भविष्याची गरज आहे. परंतु प्रस्तावित हद्दवाढीतील गावांच्याबरोबर संवाद साधून हद्दवाढीचे महत्त्व पटवून देण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
असोसिएशानचे अध्यक्ष अजय कोराणे यांचे भाषण झाले. प्रारंभी नामदार सतेज पाटील यांचे अजय कोराणे यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. उपाध्यक्ष विजय चोपदार यांनी स्वागत व प्रास्ताविक व आभार मानले.
यावेळी असोसिएशानचे सेक्रेटरी राज डोंगळे, खजाणीस उमेश कुंभार, अनिल घाटगे, गौरी चोरगे, प्रशांत काटे, जयंत बेगमपुरे, प्रमोद पोवार, विजय पाटील, प्रशांत पत्की, निशांत पाटील, उदय निचीते, सुनील मांजरेकर, चंद्रकांत घेवारी आदी उपस्थित होते. रविवारी सुट्टी असल्याने प्रदर्शनाला गर्दी झाली होती. आज खदर्शनाचा अखेरचा दिवस असून सायंकाळी 5 वाजता याचा समारोप होणार आहे.