ऑनलाईन टीम / जळगाव
भोकरदन तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे एक धक्कादायक घटना घडली असुन, केवळ पैशासाठी भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिची आई व भावानेच पैसे घेऊन तीन वेळा बालविवाह करून दिल्याचा प्रकार घडला आहे. घरच्यांनी पुन्हा तीला पुन्हा बळजबरी करत विवाह चौथ्यांदा लावण्याचा विवाह लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर मात्र असह्य झालेल्या पीडित मुलीने तेथून पळ काढून पोलीस ठाणे गाठत आपली सुटका करून घेतली. या प्रकरणी मुलीने तक्रार दिली असुन यावरुन आई, एक भाऊ, तीन पतींसह बारा जणांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तक्रारीवरुन अद्याप एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलीसांनी खुलासा केला आहे. पीढीतेचा सुमारे तीन वर्षापूर्वी मुलीचा बालविवाह तिच्या आई आणि भावांनी शेंदूर्णी येथील एका मुलाशी ( ता. जामनेर,जिल्हा जळगाव ) येथे पैसे घेऊन लावून दिला होता. तिथं एक महिना राहिल्यानंतर माहेरच्यांनी तिला परत आणून घेतले व पुन्हा सासरी पाठविले नाही. त्यानंतर आठ महिन्यांनी पुन्हा पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन दुसरा विवाह लावून दिला.
येथे तीन महिने राहिल्यानंतर तिच्या भावांनी तिला परत भोकरदनला बोलावून घेतले व त्यानंतर पुन्हा पाच महिन्यांनी भोकरदन शहरातील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तिसरा विवाह लावला. त्याच्यासोबत पीडित मुलगी औरंगाबाद येथे एक वर्ष राहिली. त्यानंतर पुन्हा वाद झाल्याने पीडित मुलगी माहेरी आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याचा अधिक तपास भोकरदन पोलिस करत आहेत.








