महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची ग्वाही : शहरातील तलावांचे जतन आणि संवर्धन करणार
कोल्हापूर / संजीव खाडे
शहरात वाढणाऱया वाहनांची संख्या वेगाने वाढत असल्याने पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून अपघाताबरोबरच वादाचेही प्रसंग घडत आहेत. पे-अँड-पार्किंगच्या माध्यमातून पार्किंगचा प्रश्न सोडविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शहरात आवश्यक त्या ठिकाणी पे अँड पार्किंगच्या पाँईंटची वाढविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. `तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शहराच्या विविध प्रश्नांबरोबर महापालिकेचे नुकतेच सादर केलेले बजेट, विकास योजना, उपक्रम आणि कोरोना विषयी घ्यावयाची काळजी यावर भाष्य केले. त्यांच्यशी झालेला संवाद
प्रश्न : आयुक्त आणि नंतर प्रशासक म्हणून काम करताना कोणता फरक जाणवतो ?
डॉ. बलकवडे : आयुक्त असताना सभागृह, पदाधिकारी आणि नगरसेवकांबरोबर चर्चा करून विविध कामकाज केले जाते. नगरसेवक, पदाधिकाऱयांचा थेट जनतेशी संपर्क, संवाद असल्याने निर्णय घेणे सुलभ होते. प्रशासक म्हणून काम करताना जनतेशी संवाद साधून काम करण्याच्या सूचना सहकारी अधिकाऱयांना दिल्या. त्यातून नागरिकांकडूनही सूचना, तक्रारीही येत आहे. त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर माजी पदाधिकारी, नगरसेवकांच्या सूचनाचाही फायदा होत आहे.
प्रश्न : प्रशासक म्हणून बजेट सादर करताना आलेल्या अनुभवाविषयी काय सांगाल ?
डॉ. बलकवडे : याआधी नागपूर जिल्हा परिषदेत सीईओ असताना बजेट सादर करण्याचा अनुभव होता. कोल्हापूर महापालिकेची प्रशासक म्हणून काम करताना सभागृह अस्तित्वात नसल्याने बजेट सादर करताना जनसहभाग वाढविला. जनतेचे बजेट, आपले बजेट ही थीम घेऊन सर्व सामान्य नागरिक, विविध क्षेत्रातील तज्ञ, मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, महापालिकेचे माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडून सूचना मागविल्या, बैठका घेऊन संवाद साधला. त्यातून रिऍलिस्टिक बजेट सादर केले. जनहिताच्या छोटÎा गोष्टी, योजनांवर भर दिला.
प्रश्न : बजेटमध्ये जमा-खर्चाचा समतोल कसा साधला ?
डॉ. बलकवडे : कोरोनामुळे महापालिकेच्या महसूल उत्पन्न वसुलीवर मर्यादा आली होती. सवलत योजनेच्या माध्यमातून घरफाळा, पाणीपट्टीची वसुली वाढविली. नागरिकांनीही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बजेटमध्ये महापालिकेचे भांडवली आणि महसुली उत्पन्न, शासन आणि वित्त आयोगाकडून येणारा निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी आदीचा मेळ घालत रिऍलिस्टिक बजेट सादर केले.
प्रश्नः शहरात सध्या पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्याविषयी काय सांगाल ?
डॉ. बलकवडे : शहरातील पार्किंगच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरींशी संवाद, चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून ज्या सूचना येतील, त्यावर अभ्यास करून कृती केली जाईल. पण सध्या आम्ही शहरात गर्दीची ठिकाणे असणाऱया भागात पे-अँड-पार्क योजना सुरू केली आहे. सरस्वती टॉकीजजवळील मल्टि लेव्हल पार्किंगचे काम सुरू आहे. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील मल्टिलेव्हल पार्किंगच्या उभारणीसाठी कार्यवाही सुरू आहे. गाडीअड्डा येथील पार्किंग सुविधा सुलभ केली जाईल. शहरातील गर्दीच्या रस्त्यावर वाहने थांबणार नाहीत, यासाठी नियोजन सुरू आहे.
शहरातील जलस्त्रोतांचे जतन, संवर्धन करणार
कोल्हापूर शहरात सध्या जे तलाव आणि इतर जलस्त्रोत शिल्लक आहेत, त्यांचे जतन आणि संवर्धन करावेच लागेल, पाणी वाचविले नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जाईल, असेही डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
शहर विकास आराखडÎाचे काम गतिमान करणार
शहराच्या तिसऱया सुधारीत विकास आराखडा तयार करण्याचे काम गेले तीन वर्षे प्रलंबित आहे, याकडे लक्ष वेधले असता डॉ. बलकवडे म्हणाल्या, या कामासाठी स्वतंत्र अधिकारी आणि स्टाफ नियुक्त झाला आहे. एजन्सीची नियुक्ती करण्याची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. लवकरच प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होईल, वेगाने आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत.
फेरीवाला झोन करणार
शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी नोंदणीकृती फेरीवाल्यांसाठी फेरीवाला झोन करण्यात येणार असून त्यासाठी समिती गठित करून त्या फेरीवाल्यांच्या नेत्यांनाही घेण्यात येणार आहे, असे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
मनपा प्रशासनाची नको कोरोनाची भीती बाळगा
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळकळीचे आवाहन केले. त्Îा म्हणाल्या, कोरोनाचा संकट पुन्हा येण्याचा धोका आहे. महापालिकेने नियमांचे पालन व्हावे, कोरोना संसर्ग रोखावा यासाठी दंड सुरू केला आहे. स्वतःसह कुटुंबासाठी नियमांचे पालन करा, महापालिका प्रशासनाची नको तर कोरोनाची भीती बाळगा, असे डॉ. बलकवडे म्हणाल्या.









