वृत्तसंस्था/ पुणे
भारतीय टेनिस क्षेत्रातील अनुभवी आणि ज्येष्ठ टेनिसपटू लियांडर पेस आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील मायभूमीवरील शेवटची स्पर्धा पुण्यात खेळणार आहे. येथे 3 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया टाटा पुरस्कृत तिसऱया महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेत लियांडर पेसला स्पर्धा आयोजकांनी पुरूष दुहेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे.
या स्पर्धेच्या ड्रॉ वेळी लियांडर पेसने भारतातील आपली ही शेवटची स्पर्धा असल्याची औपचारिक घोषणा केली. या स्पर्धेत 46 वर्षीय पेस ऑस्ट्रेलियाच्या एब्डनसमवेत दुहेरीत खेळणार आहे. या स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा स्थानिक अर्जुन कढे समवेत दुहेरीत खेळणार आहे.









