ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या पेशावर शहरात नमाजपठण सुरू असताना एका मशिदीत भीषण स्फोट झाला. यात जवळपास 30 जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी आहेत.
पाकिस्तान पोलिसांच्या हवाल्याने एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पेशावरच्या कोचा रायसलदार या प्रसिद्ध गजबजलेल्या भागात एका मशिदीत नमाजपठण सुरू असताना आज दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात जवळपास 30 जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी आहेत. काही दहशतवादी सुरूवातीला मशिदीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पोलिसांनी अडवले. त्यावेळी एक दहशतवादी जबरदस्तीने मशिदीत घुसला आणि त्याने स्वत:बरोबर आणलेल्या स्फोटकांनी मशिद उडवली.









